टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निशा रावल ही काही न काही कारणाने चर्चेत असते. प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वयक्तिक आयुष्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगत असते. 2017 मध्ये निशाचा करण मेहरासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर ती सिंगल मदर म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे. निशाच्या मुलाचं नाव काविश आहे. ती नेहमीच मुलासोबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दरम्यान तिच्या एका मुलासोबतच्या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.