
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशानची’ चित्रपट 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून अजय राय व रंजन सिंग निर्माते आहेत.
ऐश्वर्य ठाकरे या चित्रपटातून डबल रोलमध्ये अभिनयाची सुरुवात करत असून त्यांच्यासोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा महत्त्वाच्या भूमिका साकारतात.
चित्रपटातील रोमँटिक गाणं ‘नींद भी तेरी’ मनन भारद्वाज यांनी लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं असून ते प्रेम आणि नात्यांच्या नाजूक भावनांना व्यक्त करतं.