नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरकडून 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड' ची घोषणा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क शहरात 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात भारताच्या समृद्ध कलाकृतीसह संस्कृतीचं दर्शन संपूर्ण जगाला होणार आहे. 'लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिग आर्ट्स' इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात वेगवेगळ्या कलाविश्काराची मेजवाणी पहायला, अनुभवयाला मिळणार आहे. संगीत, नाट्य, फॅशन, पाककृती अशा विविध भारतीय संस्कृतीचं दर्शन या तीन दिवसीय सोहळ्यातून होणार आहे.