

NIVEDITA SARAF FOOD
ESAKAL
महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. ठिकठिकाणी वेगवेगळे पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. लोकप्रिय मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यादेखील उत्तम स्वयंपाक करतात. त्यांचा स्वतःचा पाककृतीचा वेगळा युट्यूब चॅनेल आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीचं जेवण आवडतं याबद्दल सांगितलंय. निवेदिता यांना सारस्वत पद्धतीचं जेवण आवडतं. सारस्वतांकडे विविध पद्धतीचे मासे आणि मासांहाराचे प्रकार बनवले जातात. त्यांचं शाकाहारी जेवणसुद्धा अगदी चविष्ठ असतं असं म्हटलं जातं. या मुलाखतीत निवडता यांनी त्यांच्या घरचं जेवण कसं असतं त्याबद्दल सांगितलंय.