

mitali ayekar kanyada
ESAKAL
मालिकेच्या सेटवर कलाकारांमध्ये भांडण झाल्याचं आपण ऐकतो. मात्र काही मालिकांच्या सेटवर अगदी घरासारखं वातावरण असतं. कलाकार हे एकमेकांसोबत मनाने जोडले जातात. हे कलाकार मालिका संपल्यावरही आपलं एकमेकांसोबत असलेलं नातं जपतात. असंच एक नातं होतं मिताली मयेकर आणि अभिनेते उमेश जगताप यांच्यात. उमेश आणि मिताली यांनी लाडाची मी लेक गं' या मालिकेत वडील मुलीची भूमिका साकारली होती. इथूनच त्यांच्यातील सुंदर नात्याला सुरुवात झाली. आणि खऱ्या आयुष्यातही उमेश यांनीच मितालीचं कन्यादान केलं.