
Mumbai Latest News : अभिनेता सैफ अली खानवरील हल्लाप्रकरण अजूनही ताजं आहे. या हल्ला प्रकरणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला मध्यप्रदेशातून अटक केली असल्याची माहिती समोर येतेय. पण याबाबत अजून पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये. तसंच अटक केलेली व्यक्ती म्हणजे तोच मारेकरी आहे का हे सुद्धा समजू शकलं नाहीये. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.