हॉलिवूड जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्कर विजेता प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. न्यू मेक्सिकोतील त्यांच्या राहत्या घरात दोघांचे मृतदेह आढळले आहेत. .Chhaava : छत्रपती शंभूराजांची हालहाल करून हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच ! मरतेवेळी व्यक्त केलेली ही इच्छा .जीन हॅकमन (वय ९५) आणि त्यांची पत्नी बेट्सी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळं संपूर्ण हॉलिवूड हादरुन गेलं आहे. नेमकं काय घडलंय? याची माहिती अजून समोर आलेली नाही पण पोलीस या घटनेचा तपास करत आहेत..Marathi Serial : अखेर जानकी-हृषीकेशचा रणदिवेंच्या घरी होणार गृहप्रवेश ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश .केवळ हॅकमन दाम्पत्यच नव्हे तर त्यांच्या कुत्र्याचाही मृत्यूऑस्कर विजेता प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीचा काल बुधवारी आपल्याच न्यू मेक्सिको येथील घरी मृतावस्थेत आढळले. सांता फे पोलिसांनी द सनला ही माहिती दिली आणि या दोघांच्या निधनाची पुष्टी केली. या दोघांशिवाय या दाम्पत्याचा लाडका कुत्रा देखील मृतावस्थेत आढळला आहे..Indrayani Serial : आता सुरु होणार इंद्रायणी मालिकेचं नवीन पर्व ! ही अभिनेत्री साकारणार मोठी इंदू .कारण स्पष्ट नाही, चौकशी सुरुन्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूबाबत अधिक माहिती दिलेली नाही. पण सांता फे काऊंटी शेरिफ कार्यालयाचे प्रवकते डेनिस एविला यांनी सांगितलं की, बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १.४५ वाजता घराची तपासणी करण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले होते. या ठिकाणी त्यांनी पाहिलं की, हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा आणि कुत्र्याचा मृत्यू झाला आहे..Chhaava Movie : 'त्या' सीनला मी खरोखरच विकीला मुजरा केला ; संतोषने सांगितली छावाची खास आठवण.दोन वेळेस जिंकला ऑस्कर पुरस्कारहॅकमन हॉलिवूड हे जगतील प्रसिद्ध स्टार होते. सन १९७१ मध्ये विलियम फ्रेडकिन यांची थ्रिलर फिल्म द फ्रेंच कनेक्शनमध्ये जिमी 'पोपेय' डॉयलच्या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता. सन १९९२ मध्ये क्लिंट इस्टवूडच्या विस्टर्न फिल्म 'अनफॉरगिवन'मध्ये लिटल बिल डॅगेटच्या भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.