
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दलची घोषणा 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. गेल्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.