'पंचायत' ही ओटीटीवर सर्वात गाजलेली वेबसीरिज आहे. देशात मोठ्या प्रमाणात 'पंचायत' वेब सीरिज पाहिली गेली. या वेबसीरिजचे तीन भाग प्रचंड गाजले. पहिल्या सीजननंतर या वेब सीरिजबाबत उत्सुकता प्रचंड वाढली. पंचायत 3 नंतर लगेचच पुढच्या सीजनची सुद्धा घोषणा करण्यात आली होती. आता लवकरच 'पंचायत 4' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये फुलेरामध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंगलं जाणार आहे.