NEENA GUPTA ON ROMANCE EVEN AT 80
esakal
Neena Gupta says romance exists even at 80: पंचायत या लोकप्रिय वेब सीरिजमधून घराघरात पोहचलेली मंजू देवी हिची भूमिका अभिनेत्री नीना गुप्ता यांनी साकारली. प्रेक्षकांना मंजू देवीचा अभिनय प्रचंड आवडला. दरम्यान काही महिन्यापूर्वी नीना गुप्ता यांचा मेट्रो इन दिनों हा सिनेमा चर्चेत आला होता. यावेळी नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल तसंच विचारांबद्दल स्पष्ट मत मांडलं. त्यांनी आयुष्यात अनेक गोष्टी पाहिल्या. लग्नाच्या काही दिवस आधीच त्यांचं लग्न मोडलं. विवाहित क्रिकेटपटूसोबतचं त्यांचं नातं फार चर्चेत आलं होतं. लग्न न करताच नीना गुप्ता यांनी मुलीला जन्म दिला. त्यावेळी ती खूप मोठी गोष्ट होती.