'ब्रँड तो ब्रँड असतो' नीना गुप्ताचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत, म्हणाली... 'मी ही चप्पल खास कोल्हापूरवरून मागवून घेतलेली'

Neena Gupta's Viral Video Sparks Debate: Is Prada Giving Due Credit to Kolhapuri Artisans?:सध्या सोशल मीडियावर प्राडा ब्रॅण्डने तयार केलेल्या चपलेवर सेलिब्रिटी आक्षेप घेताना दिसत आहे. आता यामध्ये नीना गुप्ताने सुद्धा व्हिडिओ शेअर करत ब्रॅण्ड तो ब्रॅण्ड असतो असं म्हणत कोल्हापूर चप्पल दाखवलीय.
Neena Gupta's Viral Video Sparks Debate: Is Prada Giving Due Credit to Kolhapuri Artisans?
Neena Gupta's Viral Video Sparks Debate: Is Prada Giving Due Credit to Kolhapuri Artisans?esakal
Updated on

अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्यामुळे तर कधी तिच्या पेहरावामुळे. परंतु सध्या नीना गुप्ता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नीना गुप्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. व्हिडिओ शेअर करत नीना गुप्ता यांनी प्राडा ब्रँडला टोला लगावलाय.

नीना गुप्ता नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अशातच तिने आता कोल्हापूर चप्पल घातलेला एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे. रिअल ते रिअल असतं असं तिने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

नीनाने व्हिडिओमध्ये म्हटलं, 'एका कामासाठी मी माझ्या एका कोल्हापुरच्या सहकाऱ्याला बोलावलं होतं. त्यावेळी मी त्याला अवर्जून माझ्यासाठी कोल्हापूर चप्पल आणशील का? असं विचारलं होतं. त्याने सुद्धा आठवणीने माझ्यासाठी ही चप्पल आणली. शेवटी खर ते खर असतं.' असं म्हटलं

इटालियन फॅशन हाऊसनं मेन्स स्प्रिंग समर 2025 कलेक्शनमध्ये एका चपलीचं सादरीकरण केलं आहे. यामध्ये हुबेहुब महाराष्ट्राची कोल्हापूरची चप्पल होती. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली ती म्हणजे, 'मोठ्या ब्रॅन्डसाठी कोल्हापुरीला श्रेय देता भारतीय कारागिराचा वापर करण्यात आलाय.' यातून नेटकऱ्यांनी पारंपारिक गारागिरांचा मुद्दा उपस्थित केलाय. दरम्यान प्रकरण जास्तच चिघळल्यानंतर प्राडानं महाराष्ट्राच्या कोल्हापुरीपासून प्रेरणा घेऊन प्रोडक्ट बनवल्याचं स्पष्ट केलं आहे.

Neena Gupta's Viral Video Sparks Debate: Is Prada Giving Due Credit to Kolhapuri Artisans?
Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com