
Bollywood News : अभिनेते परेश रावल ओळखले जातात ते त्यांचा गाजलेला सिनेमा हेराफेरीसाठी. परेश यांनी त्यांच्या कारकिर्दीत आजवर अनेक भूमिका साकारल्या पण हेराफेरीमधील बाबुराव गणपतराव आपटे ही त्यांची भूमिका अजरामर झाली. बाबू भैय्या म्हणून भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. परेश यांचा उत्तम टायमिंग आणि कॉमिक सेन्स लोकांना आवडला. या सिनेमाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि हेरा फेरी 3 ची घोषणा करण्यात आली पण अचानक त्यांनी हा सिनेमा सोडला. ज्याचा सगळ्यांनाच धक्का बसला.