परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या 'हेरा फेरी'ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. हेरा फेरी प्रमाणे 'फिर हेरा फेरी' सुद्धा तितकाच गाजला. या चित्रपटात बाबुभैय्या म्हणजेच परेश रावल यांची भूमिका प्रचंड गाजली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3' ची चर्चा सुरू होती. मात्र अचानक परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याचं जाहीर केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मात्र आता सगळं सुरळीत झालं असून परेश रावल पुन्हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार आहे. परेश राव यांनी स्वत: हे जाहीर केलय.