
Bollywood Entertainment News : हेरा फेरी 3 मधून बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल यांनी एक्झिट घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला. खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत हा सिनेमा सोडल्याची बातमी जाहीर केली. त्यांच्या या घोषणेनंतर अक्षय कुमार आणि त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. अक्षयच्या केप ऑफ गुड फिल्म्सने परेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यातच आता समोर आलं आहे की, परेश यांनी अक्षयच्या कंपनीला त्यांनी घेतलेली सायनिंग अमाऊंट परत केली आहे.