बॉलिवूडचा 'हेरा फेरी 3' चित्रपटाचा वाद काही संपायचं नाव घेत नाही. अक्षय कुमारच्या टीमने परेश रावल यांच्यावर अॅक्शन घेतल्यानंतर हा विषय अधिकच चिघळला. त्यात आता परेश रावल यांनी या प्रकरणावरील मौन सोडलंय. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहलय की, 'हेरा फेरी 3 मधून बाहेर जाण्याबाबत मी कायद्याद्वारे उत्तर पाठवलंय आणि मला आशा आहे की सगळं प्रकरण लवकरच शांत होईल'