
Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलिंगच्या केंद्रस्थानी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परिणितीने आपल्या बालपणीच्या आर्थिक संघर्षांबाबत सांगितले होते.
तिने सांगितले की, तिच्या घरात फार श्रीमंती नव्हती आणि वाढदिवसाला केक आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. अशा वेळी तिचे वडील एक रसगुल्ला किंवा रसमलाईचा तुकडा आणत आणि तेच केकसारखे कापले जायचे, असे तिने स्पष्ट केले.