

VIJAY ANADALKAR WIFE
ESAKAL
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय. यात दोन जोडप्यांची गोष्ट दाखवण्यात आलीये. त्यात पार्थ-काव्या आणि जीवा- नंदिनी या जोड्या आहेत. या दोन्ही जोड्यांचा चाहतावर्ग वेगळा असल्याने त्यांचे चाहते कायमच एकमेकांशी भांडताना दिसतात. अशातच आता मालिकेत काव्या गरोदर आहे. त्यामुळे पार्थ तिची जरा जास्तच काळजी घेतोय. त्यांच्यात रोमँटिक सीन्स दाखवले जातायत. मात्र हे सीन्स पार्थच्या खऱ्या बायकोला मुळीच आवडत नाहीयेत.