

pathrakhin serial star cast
ESAKAL
छोट्या पडद्यावर आता काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. या मालिकांमधून नवीन चेहरेही प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. स्टार प्रवाहने काही दिवसांपूर्वीच दोन नव्या मालिकांची घोषणा केली. पहिली म्हणजे 'पाठराखीण' आणि दुसरी म्हणजे 'सुना येती घरा'. 'सुना येती घरा' मालिका १५ जून पासून सुरू होणार आहे. मात्र 'पाठराखीण' ही मालिका १ जून पासून सुरू प्रदर्शित होणार आहे. मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेतील काही चेहरे आधीच समोर आलेत. मात्र त्यांच्या हिरोंची म्हणजेच मुख्य नायकांची भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांची उत्सुकता होती. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपलीये.