पवन कल्याण यांचा तिसऱ्यांदा संसार मोडला! नंदिनी, रेणूनंतर अ‍ॅना लेझनेव्हासोबतही फारकत; पहिल्या दोघींना किती दिली पोटगी?

Pawan Kalyan Anna Lezhneva Separation News: दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिसऱ्यांदा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलंय.
pavan kalyan divorce

pavan kalyan divorce

esakal

Updated on: 

तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वळण आलं आहे. वयाच्या ५५व्या वर्षी त्यांनी रशियन पत्नी अ‍ॅना लेझनेव्हा यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या तब्बल १३ वर्षांनंतर दोघांनीही संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत वेगळं होण्याची माहिती दिली. या बातमीनंतर पवन कल्याण यांच्या जुन्या मुलाखतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये त्यांनी पहिल्या दोन विवाहांमधील घटस्फोट आणि तिसऱ्या लग्नावर झालेल्या टीकेला उत्तर दिलं होतं.

Loading content, please wait...