Payal Kapadia Film: पायल कपाडियांच्या हातात पुन्हा यश, या इंटरनॅशनल अवॉर्डसाठी नामांकन

All We Imagine is Light: दिग्दर्शक पायल कपाडिया यांचा 'ऑल वी इमाजिन इज लाईट' या चित्रपटाने अनेक पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. ग्लोबल अवॉर्डच्या अपयशानंतर आता या चित्रपटाला पुन्हा एक प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
payal kapadiya
payal kapadiyaesakal
Updated on

ऑल वी इमॅजिन इज लाईट चित्रपटाच्या दिग्दर्शक पायल कपाडिया या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाला अनेक अवॉर्ड मिळाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला ग्लोबल अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. परंतु पायल यांचा सिनेमा हा पुरस्कार जिंकू शकला नाही. परंतु आता या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रतिष्ठित अवॉर्ड मिळाला आहे. डीजीए अवॉर्डसाठी या पायल कपाडिया यांना दिग्दर्शनासाठी नामांकन मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com