

BIGG BOSS MARATHI 6
ESAKAL
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम बिग बॉस मराठी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'बिग बॉस मराठी' चा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सीझनमध्ये कोण कोण पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ५' नंतर आता जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळाने बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आलाय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीये. आता या सीझनमध्ये कोण कोण दिसणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. अशातच आता एका अभिनेत्रीचं नाव समोर आलंय.