

Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांची 14 डिसेंबरला 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने कपूर कुटूंबाने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज कलाकार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटूंब दिल्लीला गेलं होतं. त्यांनी पंतप्रधान मोदींची खास भेट घेत त्यांना आमंत्रण दिलं.