Narendra Modi Movies : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मागील ११ वर्षांपासून पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मोदींच्या जीवनातील अनेक पैलू चित्रपट आणि वेब सिरीजमधून पडद्यावर झळकले आहेत. .काही चित्रपट त्यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान होईपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करतात, तर काहींमध्ये देशहितासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे दर्शन घडते. हे चित्रपट तुम्ही घरबसल्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. पाहूया यादीतील प्रमुख चित्रपट :.१) पंतप्रधान नरेंद्र मोदीया चित्रपटात विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांनी नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास दाखवतो. या प्रवासात आलेली आव्हाने आणि संघर्षही यात मांडले आहेत. हा चित्रपट तुम्ही एमएक्स प्लेअरवर पाहू शकता..२) चलो जीते हैं२०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट मोदींच्या बालपणावर आधारित आहे. आनंद एल. राय आणि मंगेश हडवले यांच्या निर्मितीत धैर्य दर्ज यांनी लहानपणीच्या नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. यात मोदींच्या बालपणीच्या संघर्षांची आणि प्रेरणादायी घटनांची मांडणी केली आहे..PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती.३) मोदी : अ जर्नी ऑफ अ कॉमन मॅन२०१९ मध्ये प्रदर्शित झालेली ही वेब सिरीज मोदींच्या बालपणासोबतच त्यांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा घेते. काँग्रेस राजवटीतील परिस्थिती आणि राजकारणात मोदींनी मिळवलेले वर्चस्व यात उलगडले आहे. यात फैसल खान, आशिष शर्मा, महेश ठाकूर, प्राची शाह आणि दर्शन जरीवाला यांच्या भूमिका आहेत. ही मालिका तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता..४) अवरोध२०२० साली आलेली ही वेब सिरीज पंतप्रधान मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर आधारित आहे. यात विक्रम गोखले यांनी नरेंद्र मोदींची भूमिका केली आहे. या मालिकेचे दोन सीझन आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. ही सिरीज तुम्ही तुमच्या कुटुंबासह सोनी लिव्हवर पाहू शकता. नरेंद्र मोदींच्या जीवनप्रवासातील विविध टप्पे आणि त्यांच्या धोरणांचा वेध घेणारे हे चित्रपट व वेब सिरीज प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.