

pooja bedi
esakal
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अशा घटना घडतात ज्या हादरवणाऱ्या असतात. आजही अनेक कलाकार असेही आहेत ज्यांचे एक्सट्रा मॅरिटल अफेअर आहेत. मात्र ९० च्या दशकातही असे अनेक कलाकार होते ज्यांचे विवाहबाह्य संबंध होते. अशीच एक जोडी तेव्हाच्या मासिकांमध्ये चांगलीच गाजली होती. ती म्हणजे पूजा बेदी आणि आदित्य पांचोली. आदित्यचं लग्न झालेलं असूनही तो पूजासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र पूजाने अनेकदा त्याच्यावर आरोप केलेत. तिच्या घरी घरकाम करणाऱ्या मुलीबद्दलही तिने त्याच्यावर आरोप केले होते. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलेलं.