

pooja birari and soham bandekar new house
esakal
छोटा आणि मोठा पडदा गाजवणाऱ्या लोकप्रिय मराठी भिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा आणि अभिनेता सोहम बांदेकर 'वेड लागलं प्रेमाचं' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी हीच्यासोबत लग्नबंधनात अडकलाय. नुकतीच या नवदाम्पत्याने आपल्या नव्या संसाराची सुरुवात केलीये. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र आता लग्नानंतर काही दिवसातच सोहम आणि पूजा बांदेकरांच्या घरात एकत्र न राहता वेगळे राहणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. त्याचं कारण स्वतः सुचित्रा बांदेकर आहेत.