

kap bashi teaser
esakal
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोग करण्यात येतायत. स्त्रियांच्या भावविश्वावर भाष्य करणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. त्यातही आई- मुलगी, सासू- सून अशा अनेक नात्यांचे पदर चित्रपटातून उलगडले गेले. मात्र आता आणखी एक नवाकोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. तो म्हणजे 'कप बशी'. सासू- सुनेचं नातं तसं किचकटच असतं. लग्नाआधी नवरा नवरीच्या पत्रिका जुळवल्या जातात. मात्र सासू-सुनेची पत्रिका कधी जुळवळीये का? याच विषयावर आधारित आहे 'कपबशी'. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय.