

jd majethia second marriage
esakal
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते जे डी मजेठिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 'खिचडी', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते जेडी मजेठिया त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत आहेत. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलीये. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. महत्वाचं म्हणजे हे लग्न त्यांच्या मुलीने अरेंज केलेलं.