

mrunal dusanis talked about mother in law
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. सध्या मृणाल 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसतेय. इथेही तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडलीये. सध्या मृणाल सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तिची मुलाखत. या मौलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केलेत. शिवाय मुलाखतीत तिने तिच्या आणि तिच्या सासूबाईंबद्दलच्या नात्याबद्दलही सांगितलंय.