लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

POPULAR SHOW ENDS SOON:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची मोठी चर्चा रंगत आहे. काही महिन्यांपूर्वी नव्या उत्साहात सुरू झालेल्या या शोमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारलेली प्रमुख भूमिका विशेष गाजली होती.
BHABHIJI GHAR PAR HAI 2.0 TO GO OFF-AIR

BHABHIJI GHAR PAR HAI 2.0 TO GO OFF-AIR

esakal

Updated on

BHABHIJI GHAR PAR HAI 2.0 TO GO OFF-AIR: छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी मालिका 'भाभीजी घर पर है 2.0' चा काही महिन्यापूर्वी प्रीमिअर झाला. या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे साकारत होती. परंतु आता शिल्पाच्या कमबॅकच्या अवघ्या दोन महिन्यातच मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. माहितीनुसार, 'भाभीजी घर पर है 2.0' ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अँड टिव्हीमध्ये मोठा बदल होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. माहितीनुसार ५ एप्रिल रोजी शेवटच्या एपिसोडचं शुटिंग होणार असून नवीन कंटेट बंद करण्याचा वाहिनीचा विचार असल्यानं मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com