

CHONGTHAM VIKRAM SINGH DEATH
ESAKAL
गेले काही दिवस सिनेसृष्टीसाठी अत्यंत वाईट गेले आहेत. एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक बातम्या ऐकायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी गायक अंकित बलियानच्या हत्येची बातमी समोर आलेली. त्यानंतर गायक बलजीत सिंग याचा संशयास्पद मृत्यू झाला. आता या दोन्ही घटना ताज्या असतानाच आणखी एका संगीतकाराच्या हत्येची बातमी समोर येतेय. जी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. महत्वाचं म्हणजे ही हत्या अत्यंत शुल्लक कारणावरून करण्यात आलीये.