

girish pardeshi comeback
esakal
छोट्या पडद्यावरील कलाकारांना प्रेक्षक सहसा विसरत नाहीत. मग तो कलाकार कितीही जुना असला तरीही त्याचा अभिनय, प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहते.त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेली असते जी पुसली जात नाही. पुन्हा हे कलाकार दिसले की चाहतेही त्यांना पाहायला आतुर होतात. असाच एक अभिनेता तब्बल १८ वर्षानंतर झी मराठी वाहिनीवर एंट्री घेणार आहे. सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका येत आहेत. त्यातल्याच एका मालिकेत हा अभिनेता महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.