

MUGDHA SHAH ENTRY IN ANANDI
ESAKAL
गेल्या काही महिन्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अनेक जुन्या कलाकारांची एंट्री झाली आहे. अनेक जुने कलाकार नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. आता अशीच एक स्टार प्रवाहची जुनी अभिनेत्री आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही अभिनेत्री आहे मुग्धा शहा. मुग्धा या महाराष्ट्राची क्रश असलेल्या हृता दुर्गुळे हिच्या सासूबाई आहेत. त्यांची आता स्टार प्रवाहवरील मालिकेत तब्बल १३ वर्षांनंतर एंट्री होणार आहे. त्या स्टार प्रवाहवरील 'आनंदी' या मालिकेत दिसणार आहेत.