Rohit Arya Had Called Marathi Actress to RK Studio Days Before the Hostage Drama
esakal
Entertainment News: 30 ऑक्टोंबर रोजी मुंबईच्या पवई भागात एक हादरवणारी गोष्ट घडली. पवईतील आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्य या व्यक्तीने काही लहान मुलांना ओलीस ठेवलं. व्हिडिओ शेअर करत त्याने आपली मागणीही सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलांना सोडवलं. परंतु पोलिस आणि राहूल यांच्या चकमकीत आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान या सगळ्यात रोहित आर्यासंबंधी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. त्याने एका मराठी अभिनेत्रीला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं असल्याचा खुलासा करण्यात आलाय.