

LALIT PRABHAKAR IN PRAHAAR MOVIE
ESAKAL
२६- ११ ला मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पकडल्या गेलेल्या अजमल कसाब याच्या विरुद्ध कोर्ट केस लढणारे वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित 'प्रहार' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. यात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने मुख्य भूमिका साकारलीय. तर मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर याने अजमल कसाब याची भूमिका केलीये. उज्ज्वल निकम यांनी कसाबला फाशी कशी मिळवून दिली याची कथा या चित्रपटात दिसणार आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेचा विषय बनलाय.