PRAHAR THE UNTOLD STORY OF UJJWAL NIKAM MOVIE REVIEW
esakal
RAJKUMMAR RAO AS UJJWAL NIKAM PERFORMANCE REVIEW: २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण मुंबईलाच नाही तर आपल्या देशाला प्रचंड हादरा बसला होता. या भ्याड हल्ल्यामध्ये कित्येकांचे निरपराध बळी गेले होते. या हल्ल्याने आपल्या देशाला अनेक जखमा दिल्या आहेत आणि आजही तो भीषण हल्ला आठवला की अंगावर शहारे येतात...मन सुन्न होते... आजही तो काळ आणि ते दिवस कित्येकांच्या स्मरणात आहेत. आतापर्यंत या हल्ल्यावर कित्येक कलाकृती बनल्या आहेत. त्यांनी आपापल्या परीने या हल्ल्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबविरुद्धचा खटला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात कसा लढविला...आपल्या युक्तिवादाच्या जोरावर आणि कायदेशीर कौशल्याच्या बळावर त्यांनी हा खटला महत्त्वपूर्ण टप्प्यावर कसा नेला... त्यावेळी त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हाने होती... अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेल्या उज्ज्वल निकम यांची कारकीर्द कशी काय होती..