

prajakta mali
ESAKAL
यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर पारंपरिक नऊवारी साडीत केलेल्या आकर्षक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात प्राजक्ताच्या या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. मोरपिशी छटेतील नऊवारी, त्यावर भरजरी शेला, पारंपरिक नथ, ठुशी, कमरपट्टा आणि मराठमोळा दागिन्यांचा साज अशा संपूर्ण लूकमधून तिने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक मंचावर अभिमानाने सादर केली. मात्र तिने नेसलेली साडी कुठली होती ठाऊक आहे का?