Prajakta Mali Reveals Her Mother Wanted to Name Her ‘Leena’:
esakal
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. प्राजक्ता माळीने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. मालिकेतील मेघना- आदित्यची जोडी प्रक्षकांच्या मनात आज देखील घर करुन आहे. प्राजक्ताने अभिनयाबरोबरच व्यवसायामध्ये सुद्धा स्वत:ची ओळख निर्माण केली. तसंच ती एक नृत्यांगना म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तसंच ती निर्माती सुद्धा आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मोठं यश संपादन केलय. अशातच आता प्राजक्ता माळीने एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.