Prajakta Mali’s New Project?
esakal
Prajakta Mali Shooting a New Serial?: प्राजक्ता माळी हिची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेने प्राजक्ताची एक वेगळी ओळख निर्माण केली. मेघना आणि आदित्य दोघेही घराघरात पोहचले. आजदेखील दोघांची मालिका सुरु व्हावी अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. दोघेही पुन्हा टीव्हीवर एकत्र दिसावे असं अनेक चाहत्यांना वाटतं. दरम्यान अशातच प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केलीय. तिची ही स्टोरी पाहून अनेकांनी ती नव्या मालिकाची सुरुवात तर नाही ना? असा अंदाज लावत आहेत.