Prarthana Behere Reveals She Visited Goddess Temple During Periods
esakal
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहमीच चर्चेत असते. मितवा सिनेमानंतर तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली. तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. त्यानंतर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून तिने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं. तसंच प्रार्थना सोशल मीडियावर सुद्धा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेक वेळा ती व्यक्त होताना पहाला मिळते. अशातच तिने नवरात्रीनिमित्त एका मुलाखतीत मासिक पाळीसंदर्भातील देवीच्या दर्शनाचा किस्सा शेअर केलाय.