Dharmaveer 2 : 'असा हा धर्मवीर' गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीस ; सुखविंदर सिंह यांच्या दमदार आवाज जिंकणार मनं

Dharmaveer 2 New Song Released : प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला 'धर्मवीर 2' या सिनेमाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. सुखविंदर सिंह यांनी हे गाणं गायलं आहे.
Dharmaveer 2
Dharmaveer 2Esakal
Updated on

Marathi Entertainment News : प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या धर्मवीर 2 या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमात साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आज पुण्यतिथीचे औचित्य साधून 'धर्मवीर २' या आगामी चित्रपटातील 'असा हा धर्मवीर...' हे गाणं आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com