Viral Video : प्रथमेश परब, क्षितिजाला पाहून अशोकमामांनी जोडले हात, म्हणाले, 'अरे हा तर...' सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
prathamesh And Ashok Saraf : प्रथमेश आणि अशोकमामा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अशोक सराफ प्रथमेशसमोर हात जोडताना पहायला मिळत आहे.
टाईमपास चित्रपटातून घराघरात पोहचलेला अभिनेता प्रथमेश परब याचा मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रात तो दगडू नावाने प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचा लाडका दगडू लग्नबंधनात अडकला. फॅशन मॉडेल क्षितिजा गोसाळकर हिच्यासोबत त्याने लग्न केलय.