PRAVIN TARDE
esakal
PUNE NARSAPUR CASE: पुणे जिल्ह्यातील नरसापूर इथं ४ वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमानं अत्याचार करून निर्घुणपणे हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. अनेकांनी या घटनेचा निषेध करत रास्तारोको केला. दरम्यान या घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान मराठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय. त्यांनी नराधामाचा एन्काऊंटर करण्याची मागणी करत अल्टिमेटम दिलाय.