
Marathi Entertainment News : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. ‘चल जाऊ डेटवर’ आणि ‘चंचल’ यांसारख्या गाण्यांनी आणि दमदार ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये एक विशेष उत्सुकता निर्माण केली असतानाच आता या चित्रपटातील 'प्रेमाचा गुलकंद' हे बहारदार शीर्षकगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. खरंतर या चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे असून यात भावना, उत्साह आहे. आता या यादीत प्रेमाच्या गुलकंदाची चव चाखवणाऱ्या 'प्रेमाचा गुलकंद'ने अधिकच भर टाकली आहे.