
Marathi Entertainment News : सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य यांच्या मनमोहक केमिस्ट्रीची जादू पाहायला मिळत आहे. दोघांच्या रोमँटिक अंदाजात पुन्हा एकदा हे सुंदर गाणं अनोख्या स्वरूपात अनुभवायला मिळेल.