मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड!

Pritam Patil On Directing Ghabadkund Movie : घबाडकुंड सिनेमाचं दिग्दर्शन प्रीतम पाटील करणार आहेत. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Pritam Patil

Pritam Patil On Directing Ghabadkund Movie

esakal

Updated on

Marathi Entertainment News : यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. विविध शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’,‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रीतम पाटील यांनी ‘अल्याड पल्याड’च्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून थरारक अनुभव देण्याचा निर्धार केला आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com