

Asambhav Movie Ott Release
esakal
Marathi Entertainment News : रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ‘असंभव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्याही मनातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.