

Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील आघाडीची वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या या वाहिनीच्या आघाडीच्या मालिकांपैकी एक असणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग. सायली अर्जुनची गोष्ट असणारी ही मालिका अनेकजण आवर्जून पाहतात. सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार असताना सायलीचं त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यापूर्वीच मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.