priydarshini indalkar
ESAKAL
Premier
आम्ही टॉक्सिक नव्हतो पण... प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं ब्रेकअपचं कारण; म्हणाली, 'तो वयाने मोठा असल्याने...'
PRIYDARSHINI INDALKAR BREAKUP REASON: लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करत तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. आपल्या सौंदर्यानेही तिने चाहत्यांना भुरळ घातली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोबतच प्रियदर्शिनी अनेक चित्रपटांमध्येही दिसली. आता पुन्हा एकदा अभिनेत्री नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लग्नाचा शॉट' या चित्रपटात ती दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलंय. मुलाखतीत तिने तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलंय.

