
बॉलिवूड अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले आहे. ते काही काळ आजारी होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. रमन राय हांडा हे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राचे काका होते. रमन राय हांडा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते कुटुंबासह मुंबईत होते. मन्नारा चोप्राचे वडील दिल्ली उच्च न्यायालयात वकील होते.