

Entertainment News : कुरळे बंधू केमिस्ट्री म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळा आनंद यांचा अखंड उत्सव! हाच उत्सव आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे दमदार, निरागस शब्दांचं आणि जबरदस्त एनर्जीने ओतप्रोत भरलेलं हे प्रमोशनल साँग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.